Friday, August 8, 2025
HomeMain Newsनेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या आयलंडवरील झाडेझुडपे काढा विद्रोहीची मागणी

नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या आयलंडवरील झाडेझुडपे काढा विद्रोहीची मागणी

सातारा येथील हुतात्मा स्मारकाच्या आवाराशेजारी असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने असलेल्या चौकातील आयलंडवर झाडेझुडपे वाढलेल्याने अस्वच्छता तिथे दिसत आहे ती सातारा नगरपालिका अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वच्छ करावी अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे

आझाद हिंद सेनेचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त सातारा शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने अभिवादन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कॉम्रेड सयाजीराव पाटील अच्युतराव जाधव , विजय मांडके यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला

नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या आयलंडवर झाडेझुडपे नेताजींच्या जयंती दिनी ही दिसली. नेताजींच्या जयंतीच्या दिनी ही तेथे स्वच्छता करण्यात आलेली नव्हती त्यामुळे सातारा नगरपालिकेने येत्या महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी तरी स्वच्छता करावी अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा शाखेच्या वतीने करण्यात आलेली आहे

महात्मा गांधी स्मृतीदिनापर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील आयलंडवरील सर्वत्रच्या संबंधित यंत्रणेने न केल्यास विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते तेथील स्वच्छता श्रमदान करून करतील असे यावेळी जाहीर करण्यात आले.

यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महेश गुरव , संकेत माने पाटील ,शुभम ढाले, रोहित क्षिरसागर हर्षदा पिंपळे, सिद्धी तिखे, सुजाता शेळके आदी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments