Saturday, August 9, 2025
HomeMain Newsनिसराळे फाटा येथे ताडी विक्री अड्ड्यावर कारवाई

निसराळे फाटा येथे ताडी विक्री अड्ड्यावर कारवाई

अवैध दारू विक्रीबरोबरच  केमिकल मिश्रीत ताडी विक्रीने परिसरात जम  बसवण्याचा प्रयत्न सुरु केला असून निसराळे फाटा येथील अशाच अवैध केमिकल मिश्रित ताडी विक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३००० रुपये किंमतीची ताडी जप्त केली आहे . याप्रकरणी रामचंद्र किसन  सूर्यवंशी वय ३१ रा . जांभगाव ता . सातारा मूळ रा . घावन ,ता . पाटण ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .

निसराळे  येथे अवैधरित्या ताडी विक्री केली जात असल्याची माहिती सपोनि .डॉ. सागर वाघ यांना  बुधवारी समजली . यावेळी त्यांच्यासह सहायक फोजदार बाजीराम पायमल ,हवालदार विजय साळुंखे ,विशाल जाधव व होमगार्ड लोहार यांनी येथे छापा टाकला . यावेळी चौडीश्वरी ऍग्रो सर्व्हिसिसेस दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये रामचंद्र सूर्यवंशी हा ताडी विक्री  करताना सापडला . त्याच्याजवळ सुमारे ३००० रुपये किंमतीच्या ६० ताडीने भरलेल्या पिशव्या जप्त केल्या . हि अवैध ताडी विक्रीसाठी नेमकी कोठून आणली जाते ?याचा मुख्य उत्पादक  सूत्रधाराच्या मुसक्या बोरगाव पोलिसांनी आवळ्यात .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments