Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रधुळे येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ पुणे येथे मोर्चा व धरणे आंदोलन

धुळे येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ पुणे येथे मोर्चा व धरणे आंदोलन

दि.१ जुलै २०१८ रोजी,राईनपाडा,ता.साक्री,जि.धुळे येथे घडलेली ही घटना. भर दिवसा नाथपंथी  डवरी गोसावी समाजातील पाच लोकांना मुले पळवणारी टोळी समजून जबरदस्त मारहाण केली गेली आणी हे पाच जण जागीच ठार झाले,अशा अनेक घटनांची  मालिका महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र शासन या बाबत कोणत्याही ठोस उपाय योजना करताना दिसत नाही .हि बाब फुले –शाहू –आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारी आहे .

या घटनेच्या निषेधार्थ भटक्या विमुक्त जमातीन सोबत काम करणाऱ्या भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन,पुणे व भटक्या विमुक्त जाती जमाती मानव सेवा प्रतिष्ठान,पुणे ,भटक्या विमुक्त जमातीनसाठी काम करणाऱ्या सर्व समतावादी संघटना यांच्या माध्यमातून दि.५ जुलै २०१८ रोजी “जिल्हाधिकारी कार्यालय “ पुणे येथे सकाळी ११.०० वाजता मोर्चा व धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे .

मागील काही दिवसापासून संपूर्ण महारष्ट्रात मुले पळवणारी टोळी आली आहे ,अशी अफवा पसरवण्यात आली आहे .गावातील नागरिक बाहेरून येणाऱ्या नवीन लोकांना बेदम मारहाण करून जीवानिशी मारत आहेत .या प्रकरणात गावोगावी फिरून काम करणारे ,भिक्षा मागणारे,कचरा गोळा करणारे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे .

नाथपंथी डवरी गोसावी हा समाज सोलापूर जिल्ह्यातून दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असतो.त्यातीलच धुळे जिल्ह्यातील या समाजातील काही लोक साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन च्या हदीतील राइन पद या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या लोकांना मुले पळवणारी टोळी आल्याचे समजून कुठल्याही प्रकारची शहनिशा व चौकशी ना करता गावकरण्यांनी या पाच लोकांना अतिशय क्रूर व मानवतेला काळिमा फासत  तरुणांना बेदम मारहाण केली .या मारहाणीत या पाचही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन अधिकार ,पुणे व भटक्या विमुक्त जाती जमाती मानव सेवा प्रतिष्ठान पुणे व भटक्या विमुक्त जमातीसाठी काम करणाऱ्या सर्व समतावादी संघटनानां या मोर्चा व धरणे आंदोलना मध्ये सहभागी होण्याचे  आव्हान करण्यात आले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments