अलीकडील पत्रकारिता हि व्यावसायिक पत्रकारिता झालेली आहे .प्रसार माध्यामात नवीन नवीन न्यूज वाहिन्यांची भर पडत आहे .खरे तर न्युज वाहिन्यांची संख्या वाढत असताना पत्रकारितेचा दर्जा खालावताना दिसत आहे.त्यात वाढ होण्याऐवजी घट होताना दिसत आहे .जी माध्यमे राजकारणाच्या सुरातसूर मिसळतील त्यांना कोणतीच अडचण येत नाही .परंतु जी माध्यमे प्रवाहाच्या विरोधात उभी राहतात त्यांना मात्र वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे .असेच काही पत्रकार धाडस दाखवून सरकार विरोधी सत्याची भूमिका मांडताना सरकारच अडचणीत येते त्या वेळी एक तर त्या माध्यमाला त्रास दिला जातो किंवा त्या मध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला त्रास दिला जातो . अशाच काही धाडसी पत्रकारांना जबरदस्तीने राजीनामे देण्यास भाग पाडले त्यामध्ये मिलिंद खांडेकर,पुण्यप्रसून वाजपेयी, अभिसार शर्मा, रविशंकर कुमार सारख्या पत्रकारांना धमक्या देण्यापर्यंत इथल्या सरकारची मजल गेलीली दिसत आहे .खरे तर चार पत्रकारांनमुळे सरकारला हादरा बसत असेल तर संपूर्ण माध्यमे एका वेळी जर उभी राहिली तर चित्र वेगळेच दिसेल परंतु तसे होणार नाही कारण प्रत्येक राजकीय विचारची पत्रकारिता वेगळी आहे .त्यामुळे चुकांविरोधी बंड करण्याचे धाडस मात्र कुणी करेल असे वाटत नाही .या चार पत्रकारांसाठी सर्व भारतभरातून चीड निर्माण होईल असे वाटत होते.परंतु स्वतःला विकणारे पत्रकार अशा चांगल्या माणसांसाठी उभे राहतील असे दिसत नाही .या चार लोकांसाठी कोणत्या माध्यामध्ये साधी चर्चासुद्धा झाली नाही. त्या मुळे हि अघोषित आणीबाणीच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .आपल्या चुका झाकण्यासाठी सरकार दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे समोर येत आहे .ज्या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा खांब म्हटले जाते त्याची हि हत्याच आहे .दहशत निर्माण करून कुणाची लेखणी सरकार दाबू शकणार नाही .हे तितकेच खरे आहे .आणि हे फक्त सत्ता हातात असे पर्यंतच टिकेल .पत्रकार हा विरोधी पक्षाची भूमिका पार पाडीत असतो.आणि ज्यांना विरोधी पक्ष नको आहे ते हुकूमशाहीचे पुरस्कर्ते असतात .