कुस्तीमधील मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील या पैलवानाणे जिकली . महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात लढत झाली . साताऱ्यात अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजने अखेरच्या ४५ सेकंदात सामन्याला कलाटणी दिली . त्याने ५-४ अशा फरकाने सामना जिकंत महाराष्ट्र केसरीचा ‘किताब आपल्या नावे केला . पहिल्या फेरीत विशाल बनकरने ४ -० अशी आघाडी घेतली होती . माती व गादी गटाच्या अंतिम सामने रंगदार झाले . त्यात गादी गटातून पृथ्वीराज पाटील तर माती गटातून विशाल बनकर महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले . पृथ्वीराज व विशाल यांच्यात पृथ्वीराजने बाजी मारली . राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या .



