Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपयांचे मूदतठेव प्रमाणपत्र

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपयांचे मूदतठेव प्रमाणपत्र

कोरोनामुळे  आई वडिलांचा मुर्त्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे . सातारा जिल्ह्यातील अशा १४ अनाथ बालकांना एकरकमी  पाच लाख रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र वितरण आज जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागातर्फे  आयोजित कार्यक्रमात करण्यात आले . कोरोना आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांना अर्थसाह्य योजना  या योजनेअंतर्गत कोरोना काळात कोरोनाच्या आजारामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक हे मुर्त्यू पावलेले आहेत . अशा बालकांच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची हि योजना आहे . या योजने अंतर्गत हि एक रक्कमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक  व जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामाहिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे .

बालकांविषयी दुःख व्यक्त करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले कि , कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्यासाठी ,त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी शासन म्हणून निश्चित योग्य ती जबादारी घेण्यात येईल . येणाऱ्या काळात त्यांच्या मालमत्ता हक्क बाबतीतहि  भविष्यात या बालकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास जिल्हाधिकारी या नात्याने या बालकांना आवश्यक ती मदत करण्यास मी नेहमीच तत्पर असेन . या वेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय तावरे ,शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे ,अनिता  आमंदे .,अनाथ बालकांचे नातेवाईक नागरिक उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments