Friday, August 8, 2025
HomeMain Newsआंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्या- राहुल गांधींचा

आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्या- राहुल गांधींचा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी, गेल्या एका वर्षात शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या 700 शेतकऱ्यांची दखल न घेतल्याबद्दल मोदी सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा संसदेत विचारण्यात आले की सरकार मृत शेतकर्‍यांना आर्थिक भरपाईचा प्रस्ताव ठेवणार आहे का, तेव्हा सरकारने सांगितले की त्यांच्याकडे आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही. कृषी विभागाकडे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही, त्यामुळे कुटुंबांना आर्थिक मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही. यावर राहुल गांधी म्हणाले की, जर सरकारकडे शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती नसेल तर आम्ही त्यांना संपूर्ण यादी देतो.

राहुल गांधी म्हणाले की सरकारकडे 403 लोकांची यादी आहे ज्यांना पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे आणि 152 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. सरकारकडे इतर राज्यांमधील 100 नावांची पण यादी आहे आणि तिसरी यादी आहे जी सार्वजनिक, ज्यातली नावं सहजपणे पडताळता येऊ शकतात. पण, आश्चर्या आहे की अशी कोणतीही यादी नसल्याचे सरकारचे म्हणते.

राहुल गांधी म्हणाले की आमच्याकडे 700 पैकी 500 शेतकऱ्यांची यादी आहे आणि उर्वरित नावे सार्वजनिक रेकॉर्डवर उपलब्ध आहेत, ज्याची सरकारने खात्री करावी. त्यानंतर मृत झालेल्या सर्व 700 शेतकरी कुटुंबांना आर्थिक भरपाई मिळावी, ही आमची मागणी आहे.

आपल्याकडून चूक झाली असं खुद्द पंतप्रधानांनी म्हटलं आहे, त्यांनी देशाची माफी मागितली आहे. त्या चुकीमुळे आतापर्यंत 700 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण आता ते त्याच्या नावांबाबत खोटे बोलत आहेत, असं राहुल गांधींनी सरकारवर टोला लगावला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत शेतकरी आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडून मागवण्यात आली होती. यासोबतच आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकार भरपाई देणार का, असा सवालही यावेळी करण्यात आला. यावर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचे उत्तर दिले होते. तोमर यांनी लेखी उत्तरात सांगितले की, शेतकरी आंदोलनामुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची कृषी मंत्रालयाकडे नोंद नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ते म्हणाले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments